श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या कोठडीमध्ये चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी झाली त्या दिवशीच या प्रकरणातील तपासामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताब आणि श्रद्ध हिमाचल प्रदेशला गेले होते तेव्हा त्यांनी गांजाची खरेदी केली होती, अशी माहिती आफताबनेच पोलीस तपासादरम्यान दिली. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये संबंधिक गांजा खरेदी व्यवहारासंदर्भातील डिजीटल तपशील सापडले आहेत.
नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर
तोच गांजा आफताबने वापरला का?
सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तामध्ये ६ मे रोजी आफताब आणि श्रद्धाने हिमाचलमध्ये गांजा खरेदी केली होती. आफताब आणि श्रद्धा १२ मे रोजी दिल्लीत परत आले होते. त्यानंतर ते दोन दिवस एका हॉटेलमध्ये थांबले होते. घरी आल्यानंतर काही दिवसांमध्येच म्हणजेच १८ मे रोजी आफताबने गळा आवळून श्रद्दाची हत्या होती. आफताबने श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण नशेत होते असंही सांगितल्याच्या बातम्या मागील आठवड्यामध्ये समोर आल्या होत्या. आपण नशेत होतो अशी कबुली आफताबने पोलीस तपासादरम्यान दिल्याचं सांगितलं जात आहे. आता नशा करण्यासाठी त्याने वापरलेले हे पदार्थ हिमाचलवरुन आणलेलेच होते का यासंदर्भातील तपास सुरु आहे. पुढील काही दिवसांत पूनावालाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी तपासासाठी नेले जाईल.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: चार सिम कार्ड, फ्रिज अन् सोशल मीडिया Accounts; आफताबसंदर्भात नवा धक्कादायक खुलासा
जुनी बिलं सापडली…
पोलिसांनी आफताबच्या दिल्लीतील छत्तरपूर येथील घरामधून काही जुनी बिलंही ताब्यात घेतली आहे. या बिलांवर वेगवेगळे फोन नंबर असल्याचं आढलून आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाच्या नावावर नोंदणी करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावरुन श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी ३०० लिटरचा फ्रिज मागवला होता. याच फ्रिजमध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. या तुकड्यांची त्याने तीन आठवड्यांमध्ये विल्हेवाट लावली होती.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”
पोलीस कोठडीमध्ये वाढ
दरम्यान, कालच आफताब अमीन पूनावालाने वकिलातर्फे मंगळवारी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी अतीव संतापाच्या भरात झाला. आफताब पूनावालाकडून न्यायालयाला सांगितले गेले, की हा गुन्हा आपल्याकडून संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. आफताबच्या वकिलांनी सांगितले, की आफताबला हे शहर अपरिचित असल्याने त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव नेमके कुठे फेकले, ती ठिकाणे ओळखण्यास त्याला अडचण येत आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “नॉन-व्हेज खाण्यासाठी आफताब श्रद्धावर बळजबरी करायचा, तिने नकार दिल्यास…”; नवा खुलासा
आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. त्याने दिलेल्या वर्णनानुसार ज्या तलावात हे अवयवाचे तुकडे फेकले होते, त्या तलावाचे रेखाचित्र काढण्यात आले आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आमच्या अर्जाच्या आधारे, आम्हाला आरोपीची आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यास मदत होईल. सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) करण्याची परवानगीही मिळाली आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान
कार्यालयात जाऊन चौकशी
श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच गुरुग्राममधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. येथे आरोपी आफताब पूनावाला काम करत असे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. येथे झडती घेतल्यानंतर कार्यालयाच्या परिसरातील झुडपांतून जप्त केलेल्या वस्तू पोलीस एका प्लॅस्टिक पिशवीतून घेऊन जाताना दिसले. मात्र त्याचा तपशील पोलिसांनी सांगितला नाही. आफताब आणि श्रद्धा मुंबईहून दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर आरोपी खासगी कंपनीत काम करत असे, त्यांनी सांगितले.