वसईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून, पोलीस भक्कम पुराव्यांसाठी कसून तपास करत आहेत. याचदरम्यान, दिल्ली पोलिसांचं एक पथक वसईत दाखल झालं आहे. दिल्ली पोलिसांकडून आरोपी आफताबचं सामना मुंबईतून दिल्लीला पाठवणाऱ्या लॉजिस्टिक कंपनीच्या मालकाची चौकशी केली जात आहे. श्रद्धा आणि आफताब मुंबईतून दिल्लीला राहण्यासाठी गेले होते. यानंतर त्यांनी आपलं सामान वसईतून दिल्लीला नेलं होतं.

दिल्ली पोलिसांनी वसईतील ‘गुड लक मूव्हर्स अॅण्ड पॅकर्स’ कंपनीचे मालक गोविंद यादव यांची चौकशी केली आहे. मिरा रोडमध्ये त्यांचं कार्यालय आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात आफताबने आपल्या कंपनीच्या मार्फत सर्व सामान दिल्लीला नेलं होतं. यामध्ये फ्रीज, भांडी आणि कपडे होते. यासाठी आफताबने २० हजार रुपये खर्च केले होते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा

Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा

श्रद्धा आणि आफताब मे महिन्यात मुंबईतून दिल्लीत वास्तव्यास गेले होते. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. १८ मे रोजी वाद झाल्यानंतर आफताबने गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने एक फ्रीज विकत आणला होता. पुढील १८ दिवस रोज रात्री घराबाहेर पडत त्याने दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत त्यांची विल्हेवाट लावली.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी गेल्या तीन दिवसात आठपेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवले आहेत. दिल्ली पोलिसांनी आफताब राहत असलेल्या मुंबईतील सोसायटीतही चौकशी केली आहे. तसंच २०२० मध्ये श्रद्धा आणि आफताब भाड्याने राहत असलेल्या घराच्या मालकीण जयश्री यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

Shraddha Murder Case: किचनमध्ये रक्ताचे डाग, नाल्यात हाडं; आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?

पोलिसांना अद्याप आफताबचं कुटुंब मात्र सापडलेलं नाही. श्रद्धाच्या हत्येच्या १५ दिवस आधी त्यांनी आपलं घर रिकामं केल्याचं समोर आलं आहे. गेल्या २० वर्षांपासून ते युनिक पार्क सोसायटीत वास्तव्यास होते.

दरम्यान गोविंद यादव यांनी आपली आफताबशी समोरासमोर कधीच भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. “दिल्लीच्या पत्त्यावर सामान पाठवण्यासाठी त्याने ऑनलाइन बुकिंग केलं होतं. २० हजार रुपयेही त्याने ऑनलाइनच भरले होते,” असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आफताबने बुकिंग केलं आणि सामान दिल्लीली नेण्यात आलं तेव्हा आपण मुंबईत नव्हतो असं त्यांनी सांगितलं आहे.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

“संपूर्ण पैसे मिळाल्यानंतर माझ्या कर्मचाऱ्यांनीच सर्व प्रक्रिया पार पाडली. आमच्याकडे अशाच पद्धतीने काम केलं जातं. सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने फार कमी वेळा आम्ही ग्राहकांना भेटतो,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

दिल्ली पोलिसांनी आपल्याकडे आधार कार्डची प्रत तसंच आफताबला दिलेली पावती मागितल्याचं त्यांनी सांगितलं आहे.