केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष म्हणजेच सरकारी पक्ष श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल अशी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांसमोर बोलताना शाह यांनी हे विधान केलं. नवीन दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. अमित शाह यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर थेट भाष्य करताना श्रद्धाचा उल्लेख केल्याचं दिसून आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर

दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये शाह यांनी, “ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल,” असा विश्वास व्यक्त केला. आफताब पुनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाचा १८ मे रोजी दिल्लीतील राहत्या घरी गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तीन आठवडे तो या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आफताब मराठी असता तर तू…”; २०१४-१५ मधील ठाण्यातील भेटीचा किस्सा चर्चेत

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने वकिलातर्फे मंगळवारी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी अतीव संतापाच्या भरात झाला. आफताबच्या कोठडीत मंगळवारी चार दिवसांनी वाढ करण्यात आली. तसेच त्याच्या सत्यशोधन चाचणीला (लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट) परवानगी दिल्याने आज ही चाचणी करण्यात येत आहे. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असंही आफताबने न्यायालयासमोर सांगितलं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”

मंगळवारी आफताबच्या वकिलांनी सांगितले, की आफताबला हे शहर अपरिचित असल्याने त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव नेमके कुठे फेकले, ती ठिकाणे ओळखण्यास त्याला अडचण येत आहे. आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. त्याने दिलेल्या वर्णनानुसार ज्या तलावात हे अवयवाचे तुकडे फेकले होते, त्या तलावाचे रेखाचित्र काढण्यात आले आहे. तपास सुरू असल्याने आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. या मागणीला मान्यता देत आता शनिवारपर्यंत आफताबच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case delhi police will ensure strictest punishment for shraddhas killer amit shah on aftab poonawala scsg