श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. १८ मे रोजी गळा आवळून श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाच्या कुटुंबियांबद्दलचीही माहिती समोर आली असून आफताबचे कुटुंबीय १५ दिवसापूर्वी वसई सोडून गेल्याचं समोर आलं आहे. आफताबचे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी दिली आहे. यामुळे आफताबच्या कृत्याची माहिती त्याच्या कुटुंबाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशातच दुसरीकडे दिल्ली पोलीसही या प्रकरणामध्ये जबाब नोंदवत आहेत. दरम्यान चौकशीमध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहेत. आफताबने श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी जो ३०० लिटरचा फ्रिज घेतला तो श्रद्धाच्याच पैशातून घेण्यात आल्याची शक्यता आहे. यासंदर्भातून तपास सुरु असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पूनावाला कुटुंबाला होती हत्येची कल्पना? १५ दिवसांपूर्वीच घर सोडताना आफताबचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला…”

आफताब ने १८ मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर १८ दिवस तो तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता. पण ज्या दिवशी श्रद्धाची हत्या केली त्याच दिवशी तिच्या बॅंकेच्या खात्यातून आफताबने ५० हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले होते. त्यानंतर २२ ते २६ मे पर्यंत तो एक हजार ते दोन हजार रुपये श्रद्धाच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने काढत होता अशी माहिती श्रद्धाच्या बँक खात्यांचा तपशीलामध्ये आढळून आली आहे. सुरुवातीला आफताबने २२ मे रोजी श्रद्धा घरातून निघून गेली असा जबाब नोंदवला होता. त्यावेळी श्रद्धा केवळ तिचा मोबाईल फोन घेऊन निघून गेल्याचा दावा आफताबने केला होता.

नक्की पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

मात्र पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईल फोनची माहिती तांत्रिक तपासाच्या आधारे शोधली असता तिचा फोन मे महिना संपेपर्यंत सक्रीय होता आणि नंतर तो बंद झाला असं समजलं. मात्र श्रद्धा फोन घेऊन निघून गेल्याचा दावा आफताब कर होता तरी फोनचं लोकेशन मात्र मेहरोलीतील छत्तरपूरच दाखवलं जात होतं. खरं तर श्रद्धाच्या मोबाईलवरुन बँक अ‍ॅपच्या सहाय्याने आफताबने पैसे खात्यावर वळवले होते. हा व्यवहार झाला तेव्हा फोन मेहरोलीमधील छत्तरपूर परिसरात असल्याचंही तपासामध्ये दिसून आलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; त्या पैशांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी आफताबला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळी आफताबने पोलिसांना माझ्याकडे श्रद्धाचा फोन आणि बँकिंग अ‍ॅपचा पासवर्ड असल्याने मी पैसे माझ्या खात्यावर वळवल्याची माहिती दिली. आफताब या पैशांनी श्रद्धाच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डचं बील भरत होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धाच्या मुंबईतील घरी जाऊन या बिलांसंदर्भातील विचारपूस करु नये म्हणून आफताब हे पैसे श्रद्धाच्या खात्यावरुन स्वत:च्या खात्यांवर वळवत बिलं भरत होता.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

पोलिसांनी असाही संशय व्यक्त केला आहे की, हत्येनंतर तिच्याच पैशाने त्याने फ्रीज, मृतदेह कापण्याचे हत्यार, घरात साफसफाईसाठी लागणारे साहित्य खरेदी केले असावे. पण या बाबत अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही.