श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणामध्ये पोलीस आता प्रमुख आरोपी असलेल्या आफताब अमीन पूनावालाचे इतर मुलींबरोबरही संबंध होते का याचा तपास करत आहे. इतर कोणत्या मुलींसोबत आफताब संपर्कात होता यासंदर्भातील माहिती पोलीस सध्या शोधत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा तपास आफताब सिरीयल किलर आहे का या अनुषंगाने केला जाणार असल्याचे समजते. आफताबच्या संपर्कात अजून काही मुली होत्या का? त्या बेपत्ता आहेत का याचा शोध पोलिसांच्या एका तुकडीकडून घेतला जात आहे.

नक्की पाहा >> Shraddha Murder Case: “मला बेडवरुनही…”; श्रद्धाचे WhatsApp, Insta चॅट दिल्ली पोलिसांच्या हाती! पाहा Screenshot

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

इतर मुलींशी संबंध होते का?
श्रद्धाप्रमाणेच आफताबने इतरही मुलींची हत्या तर केली नाही ना याचा माग पोलीस घेत आहेत. आफताब एक सायको किलर आहे का या दृष्टीकोनातूनही तपास सुरु आहे. दिल्ली पोलिसांबरोबरच मुंबई पोलीसही आफताबच्या कुटुंबियांशिवाय त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक जवळच्या व दूरच्या मित्रमैत्रिणींकडून माहिती गोळा करत आहेत. आफताबचे श्रद्धापूर्वी कोणत्या मुलीशी संबंध होते का किंवा तो इतर कोणत्या मुलीच्या संपर्कात होता का या अर्थानेही तपास सुरु आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान

अंमली पदार्थांच्या संदर्भातूनही तपास
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी आफताबने मारहाण करुन श्रद्धाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणामध्ये नालासोपारा पोलीस स्थानकामध्ये तक्रारही दाखल करण्यात आलेली. पण नंतर आफताबने माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं श्रद्धाला सांगितलं आणि तीने तक्रार मागे घेतली होती. तू तक्रार मागे घेतली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकीही त्याने श्रद्धाला दिल्याचं काही प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. आफताबने ज्या दिवशी श्रद्धाची हत्या केली त्या दिवशी अंमली पदार्थांचं सेवन केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळेच तो अंमली पदार्थांच्या व्यवसायामध्ये सक्रीय होता का या दृष्टीनेही तपास सुरु आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं नालासापाऱ्यामधील डॉक्टरांच्या हवाल्याने श्रद्धा ३ डिसेंबर २०२० ते ६ डिसेंबर २०२० दरम्यान खांदा आणि पाठीच्या दुखापतीवरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

कार्यालयात जाऊन चौकशी
श्रद्धा वालकरच्या हत्येचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरुग्राममधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. येथे आरोपी आफताब पूनावाला काम करत असे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. येथे झडती घेतल्यानंतर कार्यालयाच्या परिसरातील झुडपांतून जप्त केलेल्या वस्तू पोलीस एका प्लॅस्टिक पिशवीतून घेऊन जाताना दिसले. मात्र त्याचा तपशील पोलिसांनी सांगितला नाही. आफताब आणि श्रद्धा मुंबईहून दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर आरोपी खासगी कंपनीत काम करत असे, त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत पूनावालाला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी तपासासाठी नेले जाईल. हत्या करण्याच्या काही दिवस आधीच श्रद्धा आणि फातबात हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरुन आले होते.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

नार्कोला परवानगी
नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

आफताबविरोधात वकिलांची घोषणाबाजी
श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधात वकिलांच्या एका गटाने गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.  आरोपीला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच साकेत जिल्हा न्यायालयातील सुमारे १०० वकिलांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात गर्दी केली.