वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीच्या हत्याकांडाची चर्चा देशभरामध्ये आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने गळा आवळून प्रेयसीचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी पोलिसांनी आफताबला अटक केल्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित अनेक घटनांचा संबंध जोडला जात असतानाच दिल्लीत एका डॉक्टरने आफताबसंदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नक्की पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस
न
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताब मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला होता असं सांगितलं आहे. १८ मे रोजी आफताबने दिल्लीत छत्तरपूर परिसरातील भाड्याच्या घरात गळा आवळून श्रद्धाचा खून केला होता. त्यानंतर त्याच महिन्यात तो या डॉक्टरकडे उपचारांसाठी गेला होता. आफताबच्या तळहाताला कापलं होतं. त्यावर उपचार घेण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यामुळेच श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करतानाच आफताबला ही दुखापत झाली होती का याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज
“मे महिन्यामध्ये तो माझ्या दवाखान्यात आला होता. त्याच्या उजव्या हाताच्या तळहाताजवळ जखम झाली होती आणि त्यासाठी टाके घालावे लागले होते. तो अस्वस्थ आणि आक्रमक दिसत होता,” असं डॉक्टर अनिल यांनी सांगितलं. तसेच जखम कशी झाली याबद्दल डॉक्टर अनिल यांनी चौकशी केली असता, “फळं कापताना जखम झाली असं त्याने मला सांगितलं आणि औषधांची यादी घेऊन तो निघून गेला,” असं डॉक्टर अनिल म्हणाले.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने नोंदवला जबाब
आफताबची देहबोली कशी होती यासंदर्भात ‘टाइम्स नाऊ’बरोबर बोलताना डॉक्टर अनिल यांनी, “तो फार आत्मविश्वास असल्यासारखं भासवत होता. त्याच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. एखाद्याचा खून करुन तो आलाय असं त्याच्या देहबोलीवरुन वाटत नव्हतं. तो इंग्रजीमध्ये बोलत होता,” असं सांगितलं. आफताबला झालेली जखम फार गंभीर नव्हती असंही डॉक्टरांनी सांगितलं. एकीकडे तो फार आत्मविश्वास दाखवत होता तरी त्याच्या बोलण्यातून अस्वस्थपणा जाणवत होता. आपण मुंबईहून दिल्लीत कामासाठी आलो आहोत, आयटी सेक्टरमध्ये काम करतो, चांगल्या पगारासाठी मुंबई सोडून दिल्लीत आलो आहोत, अशी बरीच माहिती तो देत होता असं डॉक्टरांनीच सांगितलं आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…
“तो जाणूनबूजून नजरेशी नजर मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तो अतिआत्मविश्वास दाखवत होता. मात्र उदास वाटत नसला तरी फार घाईत होता आणि आक्रमकपणा त्याच्या देहबोलीमधून झळकत होता,” असं डॉक्टर अनिल म्हणाले.