दिल्लीमधील आफताब अमीन पूनावाला या २८ वर्षीय तरुणाने त्याची प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रेयसीची हत्या केल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवल्याची बाबही पोलीस तपासात उघडकीस आली आहे. आफताबने पोलिसांना कबुली जबाबात अनेक चित्रपट आणि वेबसिरीज पाहिल्यानंतर अशाप्रकारे हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचल्याचं सांगितलं आहे. यामध्ये आफताबने एका अमेरिकन क्राइम वेबसिरीजचंही नाव घेतलं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने दिली कबुली

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१९पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. दक्षिण द्लिलीचे अतिरिक्त डीसीपी-वन अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने याच संतापातून तिची हत्या केली.”

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

“आरोपी आणि श्रद्धाचं अनेकदा लग्नाच्या मुद्द्यावरुन वाद व्हायचे. १८ मे रोजी झालेल्या वादादरम्यान आफताबने गळा आवळून श्रद्धाची हत्या केली,” असंही चौहान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत सांगितलं. “आरोपीने मृतदेहाचे तुकडे केल्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर तो हे तुकडे छत्तरपूर येथील जंगली भागामध्ये एक-एक करुन नेऊन फेकायचा. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे,” असं चौहान यांनी सांगितलं. ज्या रुममध्ये आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले त्याच रुममध्ये तो मागील सहा महिन्यांपासून झोपत होता. फ्रिजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचा चेहरा तो रोज पहायचा. त्याने मृतदेहाच्या ३५ तुकड्यांची विल्हेवाट लावल्यानंतर फ्रिज साफ केला होता, असंही पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आफताबचे श्रद्धाच्या आधीही अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध होते. श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाडय़ाच्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. श्रद्धाची हत्या करण्याआधी आफताबने अनेक गुन्हेगारी कथानक असलेले चित्रपट आणि वेब सिरीज पाहिल्या होत्या. यामध्ये अमेरिकन क्राइम ड्रामा असलेल्या ‘डेक्सटर’चाही समावेश होता, असं पोलिसांनी सांगितलं.

‘डेक्सटर’ या वेब सिरीजमध्ये मुख्य पात्र लोकांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट कशापद्धतीने लावतो हे दाखवण्यात आलं आहे.