Shraddha Walkar Murder Case: वसईची तरुणी श्रद्धा वालकर हिच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाचा तिचा बॉयफ्रेंड आफताब पुनावाला याने सहा महिन्यांपूर्वी खून केला होता. १८ मे रोजी आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केल्याची माहिती कबुली आफताबने दिली आहे. खुनाच्या दुसऱ्याच दिवशी आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ भागात तुकडे करून ते फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रोज एक एक करून त्याने हे तुकडे जवळच्याच जंगलातील प्राण्यांना खाण्यासाठी फेकायचा. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेच्या विविध बाजू आता दिल्ली पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत.

तब्बल सहा महिन्यानंतर पोलिसांना नेमक्या कोणत्या गोष्टींवरून श्रद्धाच्या खुनाची माहिती मिळाली व आतापर्यंतच्या तपासात नेमकं कोणते पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहेत याविषयी माहिती आता समोर येत आहे.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य १० पुरावे

  1. पोलिसांच्या माहितीनुसार आफताबने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ज्या जंगलात टाकले होते तिथे त्यांना १० -१३ हाडे सापडली आहेत. अद्याप श्रद्धाचं डोकं सापडलेलं नाही.
  2. हाडे प्राण्याची आहेत का हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत
  3. छतरपूर फ्लॅटच्या स्वयंपाकघरात रक्ताचे डाग आढळले ज्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत
  4. रक्त आणि जप्त झालेल्या शरीराच्या अवयवांच्या तपासणीसाठी श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.
  5. आफताबच्या फ्लॅटचे पाणी बिल पाहता बहुधा रक्त आणि खुनाचे इतर कोणतेही डाग घालवण्यासाठी त्याने इतके अधिक पाणी वापरले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.
  6. तपासकर्ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधत आहेत, बहुतेक सीसीटीव्हीमध्ये केवळ 15 दिवसांचे रेकॉर्ड दिसून येतात मात्र हे प्रकरणच मुळात सहा महिने जुने आहे.
  7. श्रद्धाच्या सामानात एक बॅग सापडली आहे ज्याची ओळख पटण्यासाठी कुटुंबीयांची मदत घेतली जाणार आहे.
  8. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला असून यात त्याने दिलेली माहिती कितपत खरी आहे समजू शकेल.
  9. आफताब मे महिन्यात जखमेवर उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला होता. आफताब अस्वस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यावेळी आफताबच्या हातावर चाकूने कापल्याचे जखम होती मात्र ही जखम फळ कापताना झाल्याचे त्याने सांगितले होते.
  10. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचे बँक खाते अॅप वापरून तब्बल ५४ हजार रुपये ट्रान्सफर केले होते.

आरोपी आफताब अमीन पूनावाला याने आतापर्यंत काय कबूल केलं आहे?

सुरुवातीला जेव्हा आफताबची महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने आपण श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचे सांगितले आफताबने दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने २२ मे रोजी फ्लॅट सोडला. तथापि, पोलिसांना २६ मे रोजी श्रद्धाच्या खात्यातून ५४, ००० रुपये ट्रान्सफर केल्याचे आढळून आले होते. छतरपूरमधून हे पैसे ट्रान्स्फर केल्याचे समजत होते. 31 मे रोजी, श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट होती जी सुद्धा याच छ्तरपूर भागातील होती.

हे ही वाचा>> विश्लेषण: श्रद्धा वालकरच्या खुनाने हादरला देश; भारतात लिव्ह इन रिलेशनचे कायदे काय आहेत?

पोलिसांच्या चौकशीनंतर अखेरीस आफताबने श्रद्धाचा खून आपणच केल्याची कबुली दिली होती. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत असल्याने त्याने वैतागून तिचा खून केल्याचे सांगितले आहे. १८ मे पूर्वी एक आठवडाभर श्रद्धाला मारण्याचे त्याने मनाशी ठरवले होते, पण मारामारीदरम्यान श्रद्धा भावूक झाल्यामुळे तो मारू शकला नाही. १८ मे रोजी या जोडप्यामध्ये पूर्वी राहत असलेल्या वसईच्या घरातील सामान दिल्लीत कोण आणणार यावरून भांडण झाले ज्यानंतर त्याने तिचा गळा आवळून खून केला.

हे ही वाचा>> विश्लेषण: श्रद्धा आणि आफताब पूनावालाच्या पहिल्या भेटीस कारण ठरलेलं Bumble App नेमकं आहे तरी काय?

दरम्यान, पोलिसांना अद्यापही श्रद्धाचे डोके, तिचा मोबाईल व १८ मे रोजी श्रद्धा आणि आफताबने घातलेले कपडे सापडलेले नाहीत. आफताबने कचरागाडीत हे कपडे फेकले असा पोलिसांचा अंदाज आहे.

Story img Loader