वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची निघ्रृण हत्या सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु झाला असून आज पोलीस त्याला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले होते. प्रत्यक्षात कुठे त्याने मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत यासंदर्भातील तपासणी पोलिसांनी केली. या तपासामध्ये पोलिसांना आता आफताब श्रद्धाची हत्या करुन झाल्यानंतर काही दिवस तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता अशीही माहिती मिळाली आहे.

पाहा फोटो >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये तपासादरम्यान आफताब श्रद्धाचं अकाऊंट जून महिन्यापर्यंत वापरत होता अशी माहिती समोर आली आहे. १८ मे रोजी लग्नाच्या विषयावरुन झालेल्या वादानंतर आफताबने श्रद्धाची दिल्लीतील छत्तरपूर परिसरातील राहत्या भाड्याच्या घरात गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने एक ३०० लिटरचा मोठा फ्रिज विकत घेतला आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये भरुन ठेवले. तो रोज एक ते दोन तुकडे जंगलामध्ये जाऊन फेकायचा. दरम्यान या सर्व कालावधीमध्ये तो श्रद्धा जिवंत आहे असं भासवण्यासाठी तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता, असं पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेनं पोलीस सुत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

गुगलवर करायचा सर्च…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब गुगलवर सर्च करुन पुरावे मिटवायचा. यामध्ये फरशीवरील रक्ताचे डाग कसे पुसावेत, यासाठी कोणते रसायन वापरावे, रक्ताचे डाग पुसलेल्या कपड्यांची विल्हेवाट कशी लावावी यासारखे सर्च आफताबने गुगलवर केल्याचं समोर आलं आहे. रक्त साफ करण्यासाठी काय करता येईल इथपासून ते मानवी शरिराची रचना कशी असे इथपर्यंत अनेक गोष्टी आफताबने गुगलवर शोधल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

…म्हणून वापरत होता तिचं इन्स्ताग्राम अकाऊंट
“श्रद्धा जिवंत आहे असं भासवण्यासाठी आणि तिच्या मित्रांना ती बेपत्ता झाल्याचं संक्षय येऊ नये म्हणून आफताब तिचं इन्स्ताग्राम अकाऊंट वापरत होता,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी आफताबच्या मालकीचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलीस आफताबच्या मालिकेच्या गॅजेट्सची तपासणी करत आहेत. म्हणजेच एकीकडे आफताब श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता आणि दुसरीकडे ती जिवंत असल्याचं भासवण्यासाठी तिच्या अकाऊंटवरुन फोटो लाइक करणं वगैरे यासारख्या गोष्टी तो करत होता. यामुळे ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं तिला फॉलो करणाऱ्यांना दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी Google चा वापर, मोठा फ्रिज, अगरबत्ती अन्…; आफताबने दिली कबुली

अशी लावली विल्हेवाट
१८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह घरातील बाथरुममध्ये ठेवला होता. श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. २०१८ पासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. घरच्यांनी विरोध केल्याने दोघे आधी मुंबईत एकत्र राहत होते. नंतर ते नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालेले. श्रद्धाचा गळा दाबून तिला ठार केल्यानंतर आफताबने जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामधून मोठा फ्रिज विकत घेतला. त्यानंतर त्याने बाथरुममध्ये ठेवलेला श्रद्धाचा मृतदेहाचे घरातच तुकडे केले. हा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवता यावा यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले.

नक्की वाचा >> Shraddha Walkar Murder: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आफताबला ‘या’ वेब सिरीजमधून सुचली हत्येची कल्पना

पुढील १८ दिवसांमध्ये आफताब रोज मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे वेगवेगळ्या भागांमध्ये टाकत होता. तो पॉलिथीन बॅगमधून तुकडा घेऊन जायचा आणि जंगली भागामध्ये भिरकावून द्यायचा. मात्र हा तुकडा टाकताना तो पॉलिथीन बॅगसहीत फेकायचा नाही. तुकड्याची लवकर विल्हेवाट लागावी म्हणून तो नुसता तुकडाच फेकून द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.