Shraddha Walkar Murder Case: महाराष्ट्रातील पालघर येथील रहिवासी असणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या खूनाने संपूर्ण देश हादरला आहे. मृत श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाचा निर्घृण खून केला आहे. आरोपीनं श्रद्धाच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे करून जंगलाच्या विविध भागात फेकले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचं काम केलं जात आहे.

दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १७ तुकडे गोळा केले आहेत. हे सर्व तुकडे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर आता या हत्येप्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीनं श्रद्धाचं शिर मैदान गढी येथील तलावात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यानंतर पोलिसांनी रविवारी मैदान गढी येथील तलाव रिकामा करायला सुरुवात केली आहे.

Security forces managed to kill 12 Naxalites in an encounter on border of Bijapur Sukma district in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Nagpur It is now possible to know status of autopsy report in AIIMS with click police as well as family
एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी

हेही वाचा- Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

हा तलाव रिकामा केल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे याठिकाणी मिळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आफताब पोलिसांना खरं बोलतोय की गुंगारा देण्याचा प्रयत्न करतोय, हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. श्रद्धाचा खून सहा महिन्यांपूर्वी झाल्याने तिचं शिर योग्य स्वरुपात आढळण्याची शक्यता खूप कमी आहे, पण तिच्या शरीराचा छोटासा भागही सापडला तरी त्याची डीएनए चाचणी करता येऊ शकते, असं फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

खरं तर, आरोपी आफताफ पूनावाला याला मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या हातात अवघे दोनच दिवस उरले आहेत. म्हणून दिल्ली पोलिसांकडून वेगाने तपास केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा पुरावा शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून मैदान गढी येथील तलाव रिकामा केला जात आहे.

Story img Loader