गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरात चर्चेत असलेल्या श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात आता नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालानं मंगळवारी थेट न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला असला, तरी या प्रकरणातील सखोल तपास करण्यासाठी आता आफताब पूनावालाची पॉलिग्राफी आणि नार्को टेस्ट केली जाणार आहे. यातून आफताबनं केलेल्या या निर्घृण हत्येबाबत नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, आफताबचा अजून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनंही हा व्हिडीओ ट्वीट केला असून यामध्ये आफताब पोलिसांच्या गराड्यातही अगदी निवांतपणे FSL च्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. त्यामुळे हा खरंच श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आफताब आहे का? असा प्रश्न पडावा, इतक्या सहजपणे आफताबचा वावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आफताबला मंगळवारी पॉलिग्राफी टेस्टसाठी दिल्लीच्या एफएसएल कार्यालयात आणलं गेलं होतं. विशेष न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आफताबच्या नार्को टेस्टची परवानगी दिल्यानंतर त्याची आधी पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा तुरुंगात नेलं. मात्र, एफएसएल कार्यालयातून बाहेर पडतानाचा आफताबचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आफताबचा जवळपास पूर्ण चेहरा दिसत आहे. त्यानं काळ्या रंगाचा मास्क घातला आहे. मात्र, त्यातूनही त्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. त्यानं करड्या रंगाचा टीशर्ट घातला आहे.

व्हिडीओमध्ये आधी आफताब कार्यालयाच्या आत एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. काही वेळ त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर आफताब इतर पोलिसांच्या गराड्यात कार्यालयातून बाहेर पडताना दिसतोय. पण त्याचा सहज वावर पाहून तो खरंच श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणारा मारेकरी आहे का? असा प्रश्न पडण्याइतक्या त्याच्या हालचाली निवांतपणे होताना दिसत आहेत.

Shraddha Murder Case: त्यावेळी आफताब-श्रद्धानं एकत्र असताना केली होती गांजाची खरेदी; पोलिसांना पुरावेही सापडले

श्रद्धाचं शिर अजूनही सापडेना!

गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी ठिकठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. मंगळवारी पोलिसांनी श्रद्धाचं शिर शोधण्यासाठी दिल्लीतलं एक तळंच रिकामं केलं. मात्र, अजूनही पोलिसांना श्रद्धाचं शिर सापडलेलं नसून आफताबकडून त्यासंदर्भात तपशील मिळाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्याच्या नार्को टेस्टमध्ये श्रद्धाच्या शरीराचे उर्वरीत भाग, ज्यानं हत्या झाली ते शस्त्र आणि इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.