नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्यावरील आरोपांच्या सुनावणीसाठी दिल्ली न्यायालयाने ७ मार्च ही तारीख शुक्रवारी निश्चित केली. आफताब याने श्रद्धा हिचा गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केल्याचा आरोप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफताब याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनिषा खुराना कक्कर यांनी सुनावणीची तारीख निश्चित केली. 

पोलिसांनी २४ जानेवारी रोजी दाखल केलेल्या सहा हजार ६२९ पानांच्या आरोपपत्राची दखल ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने घेतली होती. अफताब (२८) याने त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ श्रद्धा (२७) हिची १८ मे २०२२ रोजी दिल्लीत हत्या केली होती.  तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते.  ते तुकडे त्याने अनेक ठिकाणी फेकले, असा आरोप आहे.  श्रद्धा हिच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर सहा महिन्यांनी हे हत्या प्रकरण उघडकीस आले.  दिल्ली पोलिसांनी अफताब याला १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walkar murder case court to hear arguments on charges against aaftab poonawala on march 7 zws