नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणात आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. एकीकडे हा तपास सुरु असतानाच आता श्रद्धाशी संबंधित इतर लोकांकडून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. श्रद्धाने तिच्या एका मित्राबरोबर तसेच ऑफिसमधील मॅनेरजरबरोबरच्या केलेल्या मेसेजिंगमधून आफताबकडून झालेल्या मारहाणीसंदर्भात माहिती समोर आली आहे. श्रद्धाने केलेल्या व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजमध्ये केलेल्या खुलाश्याचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: खांद्याला, पाठीला दुखापत अन् आफताबची सोबत; नालासोपाऱ्यातील रुग्णालयात आलेली श्रद्धा

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

श्रद्धाचे व्हॉट्सअप चॅट आणि इन्स्टाग्रामवरील मेसेजेचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. तिने तिचे मित्र आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांबरोबर दोन वर्षांपूर्वी केलेल्या चर्चेचे हे स्क्रीनशॉट असून यामधून आफताबने तेव्हाही तिला बेदम मारहाण केली होती हे स्पष्ट होतं आहे. आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. श्रद्दाचा खून केल्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आफताबवर आहे. दिल्ली पोलीस तसेच मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पूनावाला कुटुंबाला होती हत्येची कल्पना? १५ दिवसांपूर्वीच घर सोडताना आफताबचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला…”

दोन वर्षांपूर्वीच्या या चॅटमध्ये श्रद्धाला एवढी मारहाण करण्यात आल्याचं ती सांगत आहे की तिला बेडवरुनही उठता येत नाहीय. याच मारहाणीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं पोलिसांनी आज स्पष्ट केलं आहे. २०२० साली श्रद्धा आणि आफताब वसईमध्ये रहायचे तेव्हाचे आहेत. या चॅटमधून दोघांचं नातं कसं होतं आणि आफताब कशाप्रकारे श्रद्धाला मारहाण करायचा यासंदर्भातील कल्पना सहज येते.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

“मी आज येऊ शकतं नाही. कारण काल मला झालेल्या मारहाणीमुळे माझा रक्तदाब कमी झाला आहे आणि मला फार वेदना होत आहेत. बेडवरुन उठण्याची शक्ती माझ्यात नाही,” असं श्रद्धाने तिच्या कार्यालयामधील मॅनेजरला व्हॉट्सअप मेसेजवर कळवलं होतं. यामध्ये तिने स्वत:च्या चेहऱ्याचा फोटोही पुरावा म्हणून मॅनेरजला पाठवला होता. ज्यात तिच्या चेहऱ्यावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसून येत आहे. या संवादाचे स्क्रीनशॉट सध्या दिल्ली पोलिसांकडे आहेत. विशेष म्हणजे श्रद्धाला मारहाण झालेली आणि ती उपचारांसाठी ज्या दिवशी ही चर्चा झाली त्याच कालावधीत रुग्णालयात भरती होती या वृत्ताला डॉक्टरांनाही दुजोरा दिला आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; ५४ हजार रुपयांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

२४ नोव्हेंबर २०२० च्या या चॅटमध्ये श्रद्धाने “तो (आफताब) बाहेर जाईल याची मला खात्री केली पाहिजे” असंही म्हटलं आहे. तसेच त्याने त्याच्या पालकांशी यासंदर्भात चर्चा केल्याचंही तिने नमूद केलं आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये दोघांचं नातं संपुष्टात येण्याच्या मार्गावर म्हणजेच ब्रेकअपच्या मार्गावर होतं असा अंदाज बांधला जात आहे.

मॅनेजरने यावर तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे असं विचारलं. यावरुनच श्रद्धाने ऑफिसमध्ये त्यांचं लग्न झाल्याचं सांगितलं होतं असं म्हटलं जात आहे. “आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत,” असा रिप्लाय दिल्याचंही चॅटमध्ये दिसत आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताब झालेला जखमी? उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, “तो मे महिन्यात…”

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

तसेच तिच्या मित्राने त्याची आई आणि बहिणी श्रद्धाला मदत करु शकते असंही सांगितलं होतं. इन्स्टाग्राम चॅटमध्ये श्रद्धाने तिची नवीन हेअरस्टाइल दाखवण्यासाठी मैत्रीणबरोबर एक फोटो शेअर केला होता. यावेळेस त्या मैत्रिणीने तिच्या नाकावरील जखमांबद्दल विचारलं. त्यावर श्रद्धाने आपण शिड्यांवरुन पडल्याने नाकाला जखम झाल्यांचं तिला सांगितलं होतं. या चॅटचा स्क्रीनशॉटही पोलिसांनी पुरावा म्हणून जमा केला आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताबचा धर्म कोणता?, श्रद्धाचं Instagram Id अन्…; भारतीय Google वर काय सर्च करतायत पाहिलं का?

या चॅटनंतर आठवडाभराने म्हणजे ३ ते ६ डिसेंबर २०२० दरम्यान श्रद्धा वसईमधील एका खासगी रुग्णालयामध्ये खांदा आणि पाठीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेत होती. डॉक्टरांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.