Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा निश्चित केला आहे. तसंच कलम २०१ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही आरोप निश्चित केला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने दिल्लीच्या महारौलीच्या जंगलात आणि इतर भागांमध्ये फेकले होते. काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने आफताबवर आरोप निश्चित केले. आफताबच्या विरोधात हत्येचा आणि हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा खटला चालणार आहे. अशात आफताबने हे आरोप फेटाळले आहेत आणि मी खटल्याला सामोरा जाईन असं म्हटलं आहे. हे आरोप मला अमान्य आहेत असं आफताब पूनावालाने म्हटलं आहे.

न्यायालयाने श्रद्धाचे वडील विकास वालकर यांच्या एका याचिकेला ९ तारखेपर्यंत स्थगिती दिली होती. या याचिकेत विकास वालकर यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलीच्या मृतदेहाचे अवशेष मला द्या मला त्यावर परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करायचे आहेत. मात्र ९ मेपर्यंत या याचिकेला स्थगिती देण्यात आली आहे. आफताब पूनावालावर पोलिसांनी आयपीसी कलम ३०२ आणि कलम २०१ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आफताबने मागच्या वर्षी म्हणजे १८ मे २०२२ ला श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.

श्रद्धाच्या हत्येचं कारण काय?

चार्जशीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १७ मे २०२२ ला श्रद्धा तिच्या एका मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. १८ मे २०२२ च्या दुपारी ती परतली.श्रद्धा तिच्या दुसऱ्या मित्राच्या घरी राहिली म्हणून आफताब नाराज झाला होता. याच गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली.

१८ मे २०२२ ला काय घडलं?

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताब या दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्यानंतर या दोघांचा आवाज वाढला त्यावेळी श्रद्धा जोरजोरात ओरडू लागली. त्यावेळी आफताबने तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळून तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. हे भांडण का झालं होतं त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नव्हतं. जे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमुळे समोर आलं आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे आफताब पूनावालाने ३५ तुकडे केले होते. ते तुकडे तो महारौली येथील जंगलात फेकत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha walkar murder case murder charge framed against aftab poonawala by saket court delhi scj