पीटीआय, नवी दिल्ली : महरौली जंगलात पोलिसांनी हस्तगत केलेल्या हाडांचा ‘डीएनए’ दिल्ली हत्याकांडातील मृत तरुणी श्रद्धा वालकर हिच्या वडिलांच्या ‘डीएनए’ बरोबर जुळला आहे. पोलिसांनी ही माहिती गुरुवारी दिली. महरौली जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष शोधताना दिल्ली पोलिसांना १३ हाडे सापडली होती. श्रद्धा वालकर हिच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणाऱ्या आफताब पूनावाला याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दिल्लीतील वेगवेगळय़ा भागात टाकल्याचाही आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महरौली जंगलात सापडलेल्या हाडांचा ‘डीएनए’ श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएबरोबर जुळला आहे, असे पोलिसांनी सांगितले. ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी हाडांचे नमुने केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठविले होते. श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांना डीएनए अहवाल प्राप्त झाला असून तो उपयुक्त आहे. एफएसएल रोहिणीकडून आफताब पूनावालाच्या पॉलीग्राफ चाचणीचा अहवालही आम्हाला मिळाला आहे आणि हा अहवाल तपासात मदत करेल, असे विशेष पोलीस आयुक्त सागर प्रीत हुडा यांनी सांगितले. एका सूत्राने सांगितले की, हाडांचा डीएनए वालकरच्या वडिलांच्या नमुन्यांशी जुळतो, तसेच पूनावालाच्या घरी सापडलेल्या रक्तातून काढलेले डीएनए नमुनेही तिच्या वडिलांच्या नमुन्यांशी जुळतात.