दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखीच घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महालक्ष्मी नावाची तरुणीचा खून झाला आहे. तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती एकटीच राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खून १५ दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उजेडात आला. व्यालिकवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

Lure of job in ISRO, Lure of job in NASA,
नागपूर : इस्र, ‘नासा’मध्ये नोकरीचे आमिष; ६ कोटींनी फसवणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
badlapur rape case marathi news
मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
IC814 News What pooja kataria Said?
IC-814 : “आम्हाला ‘डॉक्टर’ने सांगितलं धर्म बदला, तुमचं सरकार…” IC-814 मध्ये असलेल्या महिलेने काय सांगितलं?
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?
Simultaneous record performance of mother-son in nagpur
नागपूर : आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप

अतिरिक्त पोलीस आयुक्त एन. सतीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही न्यायवैद्यक पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घृणास्पद गुन्ह्यामागे नेमके काय कारण होते? हे अद्याप कळू शकलेले नाही. आमचा पुढील तपास सुरू आहे.

हे वाचा >> Mira Road Murder: सरस्वती वैद्यची हत्या ‘कॉपीकॅट क्राईम’चा प्रकार? श्रद्धा वालकर प्रकरणाशी किती साधर्म्य?

श्रद्धा वालकर प्रकरण काय होते?

वसईतील श्रद्धा वालकर (वय २८) ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीत राहत होती. १८ मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुरुग्राम येथील जंगलात शरीराचे फेकून दिले. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

या प्रकरणात पोलिसांनी ६ हजार पाणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात म्हटले की, श्रद्धासोबत राहात असतानाही आफताब ‘बम्बल’ या डेटिंग अ‍ॅपवरून इतर स्त्रियांशी संपर्क साधत होता. याच अ‍ॅपवर त्या दोघांचीही भेट झाली होती. इतर स्त्रियांच्या संपर्कात असल्याचे श्रद्धाच्या लक्षात आल्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे १७ तुकडे केले आणि जवळपास तीन आठवडे ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये त्याने दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या तुकडयांची विल्हेवाट लावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

बातमी अपडेट होत आहे…