पीटीआय, नवी दिल्ली : Shraddha Walker murder case श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आफताब अमीन पूनावालाविरुद्ध आरोप निश्चितीबाबतचा निर्णय ९ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे दिल्ली न्यायालयाने निश्चित केले. आफताबवर ‘लिव्ह इन पार्टनर’ श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्याचा व मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल पाहुजा यांनी संबंधित न्यायाधीश सुटीवर असल्याने सुनावणी स्थगित केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीषा खुराणा-कक्कड यांनी १५ एप्रिल रोजी आरोपनिश्चितीसंदर्भात शनिवापर्यंत निकाल राखून ठेवला होता. वालकरच्या वडिलांनी संस्कृती-परंपरेनुसार अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीच्या पार्थिवाचे अवशेष कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीही न्यायालयाने ९ मेपर्यंत स्थगित केली.