श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांना मायदेशी परतल्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. देशावर आलेल्या आर्थिक संकटांनंतर जनतेने राष्ट्रपती भवनात काही महिन्यांपूर्वी उग्र आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी थायलंडला पलायन केले होते. त्यानंतर तब्बल सात आठवड्यानंतर ते शनिवारी मायदेशी परतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या बेपत्ता प्रकरणात राजपक्षे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राजपक्षे यांचे घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची राजकीय वाटचाल अडचणीची ठरणार आहे. २०१९ मध्ये राष्ट्रपतीपदावर विराजमान होताच राजपक्षे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारासंदर्भातील खटले मागे घेण्यात आले होते.

Asia Cup 2022 : श्रीलंकेची दमदार कामगिरी, अफगाणिस्तानवर मिळवला रोमांचकारी विजय, रचला ‘हा’ अनोखा विक्रम

दरम्यान, दोन युवा कार्यकर्त्यांच्या बेपत्ता प्रकरणात पुढील आठवड्यात राजपक्षे यांना सर्वोच्च न्यायालय समन्स बजावण्याची शक्यता आहे, असे पक्षकारांचे वकील नुलान भोपाजे यांनी सांगितले आहे. जुलैमध्ये या प्रकरणात न्यायालय राजपक्षे यांना समन्स बजावण्याच्या तयारीत असताना त्यांनी देशातून पलायन केल्याचे भोपाजे म्हणाले आहे.

संतापजनक! पद्मश्री विजेत्या कमला पुजारींना ICU मध्ये जबरदस्ती करायला लावला डान्स; VIDEO व्हायरल

१२ वर्षांपूर्वी देशातील गृहयुद्ध संपल्यानंतर दोन युवा कार्यकर्ते बेपत्ता झाले होते. त्याकाळी संरक्षण मंत्रालयावर राजपक्षे यांचा मोठा प्रभाव होता. या कार्यकर्त्यांसह काही पत्रकारांच्या अपहरण प्रकरणात राजपक्षे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे आरोप राजपक्षे यांनी फेटाळले आहेत.   