स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार म्हणून ओळख असणारे श्याम शरण नेगी यांचे आज(शनिवार) सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरचे रहिवासी असणारे नेगी १०६ वर्षांचे होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हाप्रशासनाकडून शासकीय व्यवस्था केली जात असल्याची माहिती किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसैन यांनी दिली आहे.
हेही वाचा : निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ला धक्का; इंद्रनील राजगुरूंची काँग्रेसमध्ये घरवापसी
श्याम शरण नेगी हे नुकतेच निवडणूक अधिकाऱ्याला 12-D फॉर्म परत करून चर्चेत आले होते. त्यांनी मी मतदान केंद्रावरच जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत फॉर्म परत पाठवला होता. मात्र नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि निवडणुक अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोस्टल मत घेतले.
हेही वाचा – दिल्लीत मुख्यालयातील बैठकीनंतर काँग्रेसने ४३ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने १९५२ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.
हेही वाचा – ‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!
किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग होता. त्यातही पहिल्यांदाच मतदान असल्याने मतदानाला कोणीच उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी नेगी यांनी स्वतःच आपले मतदान केले आणि ते देशाचे पहिले मतदार ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर नेगी यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात फिरून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिली. नेगी यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आलं होतं.