पीटीआय, चंडिगड
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांचा दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पंजाब सरकारने छळ केल्याचा आरोप केला आहे. हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यास सरकारकडून सांगितले जात आहे, असा आरोप बलकौर सिंग यांनी केला आहे.
‘दोन दिवसांपूर्वी ‘वाहेगुरू’च्या आशीर्वादाने आम्हाला आमचा शुभदीप (सिद्धू मूसेवाला) परत मिळाला. मात्र प्रशासन सकाळपासून त्रास देत आहे. सरकार मला मुलाची कागदपत्रे सादर करण्यास सांगत आहे. ते मला अनेक प्रश्न विचारत आहेत. सरकार मला हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यास सांगत आहेत,’ असे सिंग यांनी मंगळवारी इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली, त्यात याबाबत आरोप केला आहे.
हेही वाचा >>>चीनची भागीदारी असलेल्या पाकिस्तानमधील ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला; आठ अतिरेक्यांचा खात्मा
दोन वर्षांपूर्वी मानसा जिल्ह्यात सिद्धू मूसेवाला याची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर सुमारे दोन वर्षांनंतर, सिंग आणि त्यांची पत्नी चरण कौर यांना १७ मार्च रोजी मुलगा झाला. मुलाला जन्म देण्यासाठी त्यांनी आयव्हीएफ प्रक्रियेचा वापर केला.
सिंग यांनी एका व्हिडिओमध्ये सरकारला विनंती केली आहे की, ‘मला उपचार पूर्ण करू द्या. मी इथेच आहे आणि तुम्ही मला जिथे बोलवाल तिथे मी येईन. मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. जर मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले असेल तर मला तुरुंगात पाठवा आणि चौकशी करा.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडून कौर यांच्या आयव्हीएफ उपचारांबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.
कौर यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंत्रालयाने सांगितले की, एआरटी (नियमन) कायदा, २०२१ नुसार या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल विभागाकडे सादर करण्याची विनंती केली आहे.’ मूसेवाला यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप) सरकारवर टीका केली आहे.
हेही वाचा >>>पुतिन, झेलेन्स्की यांच्याशी पंतप्रधान मोदींची चर्चा; लोकसभा निवडणुकीनंतर दौरा करण्यासाठी निमंत्रण
पंजाब सरकारचे म्हणणे..
कौर यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मंत्रालयाने सांगितले की, कायद्यानुसार सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) सेवांचा लाभ घेण्यासाठी महिलेची वयोमर्यादा २१ ते ५० वर्षांच्या दरम्यान आहे. मूसेवाला यांचे वडील सुमारे ६० वर्षांचे आहेत, तर त्यांची आई चरण कौर ५८ वर्षांची आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि एआरटी (नियमन) कायदा, २०२१ नुसार या प्रकरणात केलेल्या कारवाईचा अहवाल विभागाकडे सादर करण्याची विनंती केली आहे.’