प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी सिद्धू मूसेवाला याच्या गाडीचा पाठलाग करून गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने काही आरोपींना अटक केली. त्यानंतर या हत्येमागे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा हात असल्याची माहिती समोर आली.पण सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? त्याचं प्लॅनिंग कसं झालं? याबाबतचा खुलासा स्वत: लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून ‘एबीपी’शी संवाद साधला आहे. यामध्ये बिश्नोईने अनेक खुलासे केले आहेत. सिद्धू मूसेवालाच्या हत्येबाबत खुलासा करताना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, “सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या प्लॅनिंगबद्दल मला माहीत होतं. पण हे प्लॅनिंग मी केलं नाही. गोल्डी ब्रार आणि माझा भाचा सचिनने हे प्लॅनिंग केलं होतं. सचिन हा माझ्या गावचा आहे. तो माझा भाचा लागतो.”

“माझा भाऊ विक्की मिड्डूखेडा याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही सिद्धू मूसेवालाची हत्या केली. विक्कीची हत्या घडवून मूसेवालाला कदाचित डॉन बनायचं असेल. तो त्याच्या गाण्यांना वास्तवात उतरवू इच्छित असेल. विक्कीची हत्या होण्यापूर्वी सिद्धू मूसेवालाशी आमचं काहीही वैर नव्हतं. पण तो आमच्या विरोधी गँग्सना हाताशी धरून आमच्याविरोधात कारवाई करत होता. त्यामुळे मी गोल्डी ब्रार आणि सचिनला म्हटलं होतं की, सिद्धू मूसेवाला आपला शत्रू आहे. त्याला समजावून सांगा, त्यांने ऐकलं तर ठीक… अन्यथा त्याच्याविरोधात काहीतरी ठोस कारवाई करा,” असा खुलासा लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhu moosewala murder case gangster lawrence bishnoi latest interview rmm