पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात गोळय़ा झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणी आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी देवेंद्र उर्फ काला याला अटक केली आहे. हरियाणाच्या फतेहबाद येथून देवेंद्रला बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या इतर दोन संशयितांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
विश्लेषण : ‘टिब्बेयां दा पुत्त’ आणि सिद्धू मुसेवाला… काय आहे कनेक्शन?
पोलिसांना देवेंद्र याने केशव आणि चरणजीत या दोन संशयितांना आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली असल्याची माहिती मिळाली होती. १६ आणि १७ मे रोजी हे दोन संशयित वास्तव्यास होते. याआधी पोलिसांनी पवन आणि नसीब या दोघांना अटक केली आहे. या दोघांना भिरदाना येथून अटक करण्यात आली होती.
हत्येचा न्यायिक आयोगामार्फत तपास
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक आयोग नेमण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. आपल्या मुलाच्या हत्येचा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकरवी तपास व्हावा, अशी मागणी मूसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांनी मान यांना केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. या तपासात पंजाब सरकारने सीबीआय व एनआयए यांनाही सहभागी करावे, असेही त्यांनी म्हटले होते.
विश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे?
सिद्धू मोसेवाला यांची २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने फेसबुकच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.