Goldy Brar Detained In California :प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतलेला मुख्य आरोपी गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियात अटक करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना याबाबतची माहिती मिळाल्याचे म्हटले जात आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियात अटक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या रॉ, आबी, पोलिसांचे विशेष पथक, पंजाप इंटेलिजन्स यांना याबाबतची माहिती मिळाल्याचे म्हटले आजत आहे. मात्र कॅलिफोर्निय सरकारने या अटकेबाबत अद्याप कोणतीही रितसर माहिती दिलेली नाही.
हेही वाचा >>> “नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात ध्यानधारणा…”, तुरुंग अधिकाऱ्यांचा ‘पॉझिटिव्ह फीडबॅक’, जानेवारीतच होणार सुटका?
गोल्डी ब्रार कोण आहे?
कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी उचललेली आहे. त्याने ही हत्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्यासोबत मिळून केली होती. कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून त्याने हे हायप्रोफाईल हत्याकांड घडवून आणले होते. या हत्येनंतर पोलीस त्याच्या शोधात होते.
सिद्धू मुसेवालांवर ३० गोळ्या झाडल्या…
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला करण्यात आला होता. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असताना सिद्धू मुसेवाला गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता.
हेही वाचा >>> मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी, लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
सिद्धू मुसेवाला यांना चार शसस्त्र सुरक्षारक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती. या सुरक्षेमध्ये २८ मे रोजी कपात करुन पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या भगवंत मान सरकारने केवळ दोन सुरक्षारक्षक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. सिद्धू मुसेवाला यांच्याकडे बुलेटप्रूफ फॉर्च्यूनरही होती. मात्र ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसह प्रवास करत होते.
हेही वाचा >>>“हिंदू कधीही दंगलीत…”, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं विधान
सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केलं होतं. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला होता.