Sidhu Moose Wala Murder: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या कोठडीत आहे. बिश्नोईला लवकरच बठिंडा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी बिश्नोईचा पंजाब पोलिसांकडून एनकाऊंटर केला जाईल, अशी भीती बिश्नोईच्या वकिलांनी व्यक्त केली आहे. “बिश्नोईला न्यायालयात हजर करताना पंजाब पोलीस त्याचा एनकाऊंटर करतील. त्यानंतर कोठडीतून पळून जाताना चकमकीत ठार झाल्याचा बनाव रचतील” असा आरोप वकिलांनी केला आहे.
सलमान खानला जीवेमारण्यासाठी बिश्नोई गँगने रचला होता प्लँन B; शार्प शुटर्संनी सुरक्षा रक्षकांसोबत…
गायक सिद्धू मुसेवालांच्या हत्या प्रकरणात सध्या बिश्नोईची पंजाब पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी कुठे आणि कशी पद्धतीने केली जात आहे, याबाबतची माहिती पंजाब पोलिसांच्या काही निवडक अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही नाही.
सिद्धू मूसेवालांच्या वडिलांना धमकीचा ई मेल; दिल्लीतून एकास अटक
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसोबत प्रवास करत असताना हा हल्ला करण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणात ३५ जणांचा सहभाग असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, लारेन्स बिश्नोई टोळीने प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच पंजाब पोलिसांनी केला होता.