बालासोर येथे जून महिन्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा तिहेरी रेल्वे अपघात घडल्याचं समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन सक्रिय झालं आहे. यादरम्यान, रेल्वे मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, जून महिन्यात देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर एकूण ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अहवालानुसार, जून महिन्यातील एकूण आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी २४० वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. म्हणजेच एकट्या जून महिन्यात तब्बल ७ हजार २१६ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यापैकी उत्तर भागात सर्वाधिक म्हणजे १६९० वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…

गेल्यावर्षी यंदा सर्वाधिक बिघाड

एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याचा आकडा ४५ टक्क्यांनी मोठा आहे. तर, गेल्या वर्षीच्या जून महिन्यापेक्षा या जून महिन्यात ५० टक्क्यांनी अधिक वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली आहे. उत्तर विभागात सर्वाधिक म्हणजे १६९० वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती, तर, पूर्व विभागात ८०८ वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता.

एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत १६ हजार ४५८ वेळा सिग्नल यंत्रणा बिघडली होती. तर, गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जून महिन्यात हीच आकडेवारी १५ हजार १२९ होती.

इंजिन बिघाडातही वाढ

लोको फेल्युअर होण्याच्या म्हणजेच इंजिनात बिघाड होण्याच्या घटनेतही जून महिन्यात वाढ झाली आहे. १३५४ वेळा इंजिनात बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तर, मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागात सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गेल्या जून महिन्यात हीच आकडेवारी १२५० होती. यापैकी ३३७ मालगाड्यांचे इंजिन बिघडले होते, तर १५२ प्रवासी रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाला होता.

ओव्हरहेड वायरमधील बिघाडामळे रेल्वेला लेटमार्क

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याच्याही घटना जूनमध्ये घडल्या आहेत. जून महिन्यात २५१ वेळा ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहेत. गेल्यावर्षी इंजिन बिघडण्याचे १९९ प्रकरण घडले होते.

अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

ठउन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. जिथे मशिन्स असतात तिथे त्या बिघडण्याचीही शक्यता असते. आमच्या यंत्रणेनुसार दररोज हजारो गाड्या धावत असतात. त्यामुळे अशावेळी उपकरणांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते”, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली.