जून महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मात्र, या घटनेच्या तीन महिन्यांनंतर कॅनडानं हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करत भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची कॅनडातून हकालपट्टी केली. त्यावर भारतानंही आरोप फेटाळत जशास तशी भूमिका घेतली व कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. या प्रकरणाचे पडसाद थेट ब्रिटनच्या संसदेमध्येही उमटले आहेत. ब्रिटनच्या संसदेतील शीख खासदारांनी यासंदर्भात संसदेत भूमिका मांडली आहे.

नेमकं काय घडलंय?

अवघ्या १० दिवसांपूर्वी जी २० परिषदेच्या निमित्ताने भारतात पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन करताना दिसले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या दृष्टीने कॅनडाच्या तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचं निवेदन कॅनडाच्या संसदेत केलं. त्यापाठोपाठ कॅनडानं भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. भारतानंही कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी करून जशास तसं उत्तर दिलं. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटू लागले आहेत.

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?

भारत-कॅनडा तणाव वाढला; पंतप्रधान ट्रुडो म्हणतात, “आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नव्हतं, फक्त…”!

अमेरिकन अभ्यासकांनी कॅनडाला ठणकावलं

या प्रकारावरून अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक मायकेल रुबिन यांनी कॅनडाला सल्ला दिला आहे. “पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी घेतलेली भूमिका निर्लज्जपणाची व वेडगळ आहे. ते आगीशी खेळत आहेत. या भूमिकेमुळे त्यांना दीर्घकाळात राजकीय फायदा होईलही. पण याला नेतृत्व म्हणत नाही”, असं ते म्हणाले. तसेच, भारत व पाकिस्तानबाबत कॅनडा वेगवेगळी भूमिका घेत असल्याचाही दावा त्यांनी केला.

“निर्लज्ज आणि वेडगळ”, अमेरिकेतील अभ्यासकांनी कॅनडाला ठणकावलं; म्हणे, “ते आगीशी खेळतायत”!

“अनेक शीखांचे आम्हाला फोन”

दरम्यान, या सर्व प्रकरणाचे पडसाद ब्रिटनच्या संसदेत उमटताना पाहायला मिळत आहेत. ब्रिटनच्या संसदेतील लेबर पार्टीचे शीख खासदार तन्मनजीत सिंग धेसी यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. “कॅनडामधून येत असलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. ब्रिटनमधील व विदेशातीलही अनेक शीख समुदायाच्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. हे लोक संभ्रमित, संतप्त व घाबरलेले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या मित्रदेशांच्या मदतीने काम करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आम्हीही ब्रिटनच्या सरकारच्या संपर्कात असून कॅनडातील या प्रकरणात न्याय होईल यासाठी प्रयत्न करू”, असं धेसी म्हणाले.

तन्मनजीतसिंग धेसी यांचं ट्वीट (फोटो सौजन्य – ट्विटरवरून साभार)

ऑस्ट्रेलियानंही व्यक्त केली चिंता

एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनीही ट्रुडो यांच्या आरोपांवर चिंता व्यक्त केली आहे. “या बातम्या चिंताजनक असून त्यासंदर्भात सखोल चौकशी चालू असल्याचं आम्हाला समजलं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही यासंदर्भात भारताशीही चर्चा केली आहे”, असं वोंग म्हणाल्या आहेत.