अफगाणिस्तानातील अनेक शीख आणि हिंदूंना भारतात नव्हे तर अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थलांतर करण्याची इच्छा आहे. त्यामुळे, अमेरिका आणि कॅनडाला जाण्याचं स्वप्न असणाऱ्या या नागरिकांना काबूलमधून बाहेर पडण्यास आणि स्थलांतर करण्यास मोठा विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर, अखेर मध्यस्थांनी या नागरिकांना भारत सरकारचं बचाव कार्य संपवण्यापूर्वी लवकरात लवकर आपला निर्णय घेण्याबद्दल सावध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चांधोक यांनी मंगळवारी सांगितलं कि, “गुरुद्वारा कर्ते पर्वानमधील सुमारे ७० ते ८० अफगाण शीख आणि हिंदूंना भारतात स्थलांतर करण्याची इच्छा नव्हती. कारण ते कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्यास उत्सुक आहेत”. ते म्हणाले की, “हे अफगाणी नागरिक केवळ सध्या सुरु असलेल्या एकूण स्थलांतर प्रक्रियेत अडथळे निर्माण करत नाहीत. तर इतरांना बाहेर पडण्यास किंवा स्थलांतर करण्यास देखील विलंब करत आहेत.”

अमेरिकेच्या स्वप्नासाठी त्यांनी दोन फ्लाईट्स चुकवल्या

“खरंतर भारत सरकारकडून या सर्व नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. मात्र, तरीही अमेरिका किंवा कॅनडाला जाण्याच्या इच्छेसाठी या लोकांनी दोन फ्लाईट्स चुकवल्या आहेत,” असा आरोप देखील पुनीत सिंह चांधोक यांनी केला आहे. दरम्यान, गुरुद्वारा कर्ते परवनमध्ये आश्रय घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या शीख आणि हिंदूंनी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचे एक नेते तलविंदर सिंग यांनी विशेषतः सांगितलं होतं कि, या नागरिकांनी कॅनडा किंवा अमेरिकेत स्थलांतरित केलं पाहिजे.

एका शीख संघटनेने दिलं होतं हे आश्वासन

सूत्रांनी सांगितलं आहे की, एका शीख संघटनेने चार्टर्ड विमानातून सर्व अफगाणिस्तान शीख आणि हिंदूंना बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर सुमारे १०० जण काबुल विमानतळाच्या बाहेर जमले होते. परंतु, त्यावेळी त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. दरम्यान, खरंच चार्टर्ड विमान त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं की नाही हे देखील स्पष्ट नव्हतं.

अफगाणिस्तानमधील एका सूत्राने सांगितलं कि, “अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थलांतर करण्यात काय चूक किंवा नुकसान आहे? उलट जे भारतात स्थलांतरित झाले त्यांचं भवितव्य आम्हाला माहीत आहे. तिथे नोकरीच्या संधी नाहीत त्यामुळे त्यापैकी बरेच जण एकतर परतले किंवा इतर देशांमध्ये गेले.”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikhs and hindus afghanistan hope for america not india delay airlift gst