अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाचे आघाडीचे उमेद्वार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात पश्चिमेकडील आशियाई देशातील मुस्लीम आणि शीख समाज उभा आहे.
अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोहीमेत मोठय़ा प्रमाणात मुस्लीम आणि शीख समाज सामिल झाला होता. तसेच ट्रम्प कधीही आमच्या समाजाविरोधात नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
मेरीलँडमधील वाशिंग्टन डीसीच्या एका उपनगरात ट्रम्प यांच्यासाठी एक मोहिम आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक मुस्लीम आणि शीख समुदायातील नागरिक ‘शीख अमेरिकन फॉर ट्रम्प’ आणि ‘मुस्लीम अमेरिकन फॉर ट्रम्प’ असे बॅनर घेऊन उभे होते.
ट्रम्प कधीही या दोन्ही समुदायांच्या विरोधात नव्हते, माध्यमांकडून त्यांच्या वक्तव्याचा विपऱ्ह्य़ास केला जात असल्याचे बॅल्टीमोरमधील शीख मंडळाचे अध्यक्ष जसदीप सिंग यांनी सांगितले.
तसेच ट्रम्प यांनी कधीही मुस्लीम समुदायाला उद्देशून चूकीचे वक्तव्य केले नाही, त्यांनी सिरीयामधील निर्वासितांच्या संकटाबद्दल वक्तव्य केले होते आणि आम्ही त्यांच्या मताशी सहमत असल्याचे सिंग यांनी सांगितले.
शीख, मुस्लीम समाजाचे ट्रम्प यांना समर्थन
मेरीलँडमधील वाशिंग्टन डीसीच्या एका उपनगरात ट्रम्प यांच्यासाठी एक मोहिम आयोजित करण्यात आली होती.
First published on: 07-03-2016 at 02:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikhs and muslims join donald trump