पीटीआय, बीजिंग/मनिला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन-फिलिपाईन्स दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण चीन समुद्रावर (एससीएस) आपला दावा सांगण्यासाठी झालेल्या संघर्षांला सोमवारी हिंसक वळण लागले. परदेशी जहाजांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नवीन नियम जारी केल्यानंतर चीन-फिलिपाईन्सच्या नौदल जहाजांची चिनी समुद्रात धडक झाली. फिलिपाईन्स आणि चिनी जहाजांनी दुसऱ्या थॉमस शोलजवळील समुद्रात बेकायदेशीर प्रवेश केला. यानंतर ही धडक झाल्याचे चीनच्या तटरक्षक दलाने सांगितले.

दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोलवर फिलिपाईन्सने आपला दावा सांगण्याचे जोरदार प्रयत्न केल्यामुळे दोन्ही देशांच्या नौदल आणि तटरक्षकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. चिनी जहाज सोमवारी सकाळी फिलिपाईन्सच्या जहाजाला बांधकाम साहित्य पोहोचवण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात धडकल्याचे चीनच्या तटरक्षक दलाने निवेदनातून सांगितले. सोमवारी सकाळी फिलिपाईन जहाजाने केलेल्या बेकायदेशीर घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून हा नियामक उपाय केल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. वारंवार दिलेल्या कडक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून फिलिपाईन्सचे जहाज मुद्दाम आणि धोकादायकपणे ‘रेनई जिओ’लगतच्या पाण्यात चिनी जहाजांच्या जवळ आले. यामुळे समुद्रातील टक्कर रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन झाले, ज्याची जबाबदारी संपूर्णपणे फिलिपाईन्सची आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यामध्ये कोणतेही नुकसान वा जीवितहानी झाले नसल्याचेही सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sino philippines ship collision south china sea conflict turns violent amy
Show comments