Sisamau Bypolls 2024: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीबरोबर उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या ९ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. या निवडणुकीत कानपूर महानगरमधील सीसामऊ विधानसभेचाही समावेश आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि समाजवादी पक्षाचा उमेदवार आमने-सामने आहेत. समाजवादी पक्षाच्या उमेदवार नसीम सोलंकी यांनी दिवाळीच्या दिवशी शिवमंदिरात प्रार्थना करत दीप प्रज्वलन केलं होतं. शिवमंदिरातील दीप प्रज्वलनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि यावरूनच उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी प्रकरण काय?

नसीम सोलंकी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नसीम सोलंकी या शिवलिंगावर पाणी आणि फुले अर्पण करताना दिसत आहे. यावेळी त्यांनी मंदिरात दिवाही लावला. त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मौलाना यांनी म्हटलं की, “इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे. जर कोणी स्वेच्छेने अशी पूजा करत असेल तर त्याला कठोर नियम लागू होतात. जर महिलेने अजाणतेपणी असे केले असेल तर ती शरियतच्या दृष्टीने दोषी आहे आणि तिला पश्चात्ताप करणे आवश्यक आहे.” दरम्यान, मंदिराच्या पुजाऱ्यांनी शुद्धीकरण करून हरिद्वारहून गंगाजल मागवून संपूर्ण मंदिर आणि शिवलिंग धुतल्याने या प्रकरणाचा वाद वाढला आहे.

हेही वाचा : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”

दरम्यान, नसीम सोलंकी यांचे पती इरफान सोलंकी यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सीसामऊ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, एका जाळपोळ प्रकरणी ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर इरफान सोलंकी यांना विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात आता नसीम सोलंकी या निवडणूक लढवत आहेत. आता येथे मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

नसीम सोलंकी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

नसीम सोलंकी यांनी म्हटलं की, मी प्रत्येक धर्माचा आदर करते. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात बोलावण्यात आलं होतं आणि मी त्या ठिकाणी गेले. मंदिराला भेट दिल्यानंतर ती गुरुद्वारातही गेले होते. येत्या काही दिवसांत ती चर्चमध्ये कार्यक्रमही ठेवू शकते. तसेच मला कोणत्याही धर्माचा आदर करण्यास आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देण्यास त्यांना कोणतीही अडचण नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sisamau bypolls 2024 political controversy over temple visit of sp women candidate naseem solanki in kanpur gkt