अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांवर गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात बनावट पुरावे तयार केल्याचा आरोप यात करण्यात आला.

सेटलवाड यांच्यासह गुजरातचे निवृत्त पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. तपास अधिकारी साहाय्यक पोलीस आयुक्त बी. व्ही. सोलंकी यांनी याबाबत माहिती दिली. नंतर वकील झालेले माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा यांचे  साक्षीदार म्हणून आरोपपत्रात नाव आहे. जून महिन्यात अटक झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. श्रीकुमार आणि भट्ट हे अन्य दोन आरोपी कोठडीत आहेत.

आरोप काय?

सेटलवाड यांच्यासह तिघांवर फसवणुकीच्या उद्देशाने बनवाबनवी, महत्त्वाचे आरोप सिद्ध व्हावेत या उद्देशाने बनावट पुरावे सादर करणे, सरकारी अधिकाऱ्याने चुकीची नोंद करणे किंवा एखाद्याला शिक्षेपासून वाचवण्यासाठी नोंदी करणे असे आरोप आहेत.

Story img Loader