भारतीयांच्या परदेशातील काळ्या पैशाच्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय होऊ घातला आह़े या संदर्भात नवनिर्वाचित केंद्र शासन येत्या आठवडय़ात अधिसूचना काढण्याची शक्यता आह़े
हे तपास पथक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एम़ बी़ शहा यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात येणार असून माजी न्या़ अरिजित पसायत या पथकाचे उपाध्यक्ष असणार आहेत़ तसेच दहा विविध तपास संस्थांचे प्रमुख किंवा उच्चाधिकारी या पथकाचे सदस्य असणार आहेत़ परदेशातील काळा पैसा किंवा बेहिशेबी मालमत्तेच्या सध्या सुरू असलेल्या, तसेच अद्याप सुरू न झालेल्या आणि सुरू होऊन संपलेल्या अशा सर्व खटल्यांमध्ये तपास करण्याचे अधिकार या पथकाला असणार आहेत़
केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपास पथक स्थापण्याचा अंतिम निर्णय लवकरच म्हणजे अगदी पुढील आठवडय़ातच होण्याची शक्यता आह़े सर्वोच्च न्यायालयाने २३ मे रोजी केंद्राला अशा प्रकारचे पथक आठवडय़ाभरात स्थापण्याचे आदेश दिले होत़े
पथकाच्या विचारार्थ विषयानुसार, या पथकाला या पुढे काळा पैसा निर्माणच होऊ नये यासाठी संस्थात्मक बांधणी करण्याचेही अधिकार असणार आहेत़
कामकाजासंदर्भातील महत्त्वाच्या घटना वेळोवेळी न्यायालयाला कळविणे पथकाला बंधनकारक असणार आह़े तसेच पथकाला त्यांचा अहवाल तयार करता यावा, यासाठी भारत शासनाने देशातील आणि देशाबाहेरील कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून द्यावीत, असेही नमूद करण्यात आले आह़े
एसआयटीमध्ये समावेश कुणाकुणाचा?
एसआयटीमध्ये महसूल विभागाचे सचिव, रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, गुप्तहेर खात्याचे संचालक, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक, सीबीआयचे संचालक, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आदी बडय़ा अधिकाऱ्यांचा समावेश असणार आह़े तसेच महसूल गुप्तचर विभागाचे महासंचालक आणि वित्तीय गुप्तचर विभागाचे संचालक आणि सहसचिव हेही या पथकाचे सदस्य असतील.
काळ्या पैशासंदर्भातील सर्व खटल्यांसाठी विशेष तपास पथक?
भारतीयांच्या परदेशातील काळ्या पैशाच्या सर्व प्रकरणांची तपासणी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय होऊ घातला आह़े
आणखी वाचा
First published on: 26-05-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit for black money cases to be notified soon