Indian politicians who died in 2024 : २०२४ हे खऱ्या अर्थाने निवडणुकीचं वर्ष होतं. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तसंच, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या रणधुमाळीत यंदाचा भारतीय समाज व्यस्त होता. त्यातच, काही मोठ्या राजकीय नेत्यांचा या वर्षात मृत्यूही झाला आहे.

बाबा सिद्दिकी

महाराष्ट्रातील काँग्रेसचे चारवेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू सर्वांत धक्कादायक होता. त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली अशून या्परकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

सीताराम येचुरी

भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सीताराम येचुरी यांचं १२ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. ते २००५ ते २०१७ या काळात पश्चिम बंगालचे राज्यसभा खासदार होता. ते कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव देखील होते. पार्टी ऑफ इंडिया आणि १९९२ पासून पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे ते सदस्य राहिले आहेत.

सुशील कुमार मोदी

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं १३ मे २०२४ रोजी निधन झालं. २००५ ते २०१३ आणि पुन्हा २०१७ ते २०२० दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय. त्यांना कर्करोग झाला होता.

नटवर सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्या युपीए सरकारमधील परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते नटवर सिंग यांचं १० ऑगस्ट २०२४ रोजी निधन झालं. सिंग यांनी भारतीय परराष्ट्र सेवा म्हणून त्यांच्या कारकि‍र्दीला सुरुवात केली. १९५३ मध्ये अधिकारी आणि लोकसभा खासदार म्हणून राजकारणात प्रवेश करण्यासाठी १९८४ मध्ये त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली होती.

जित्ता बाळकृष्ण रेड्डी

भारत राष्ट्र समितीचे नेते जित्ता रेड्डी यांचं वयाच्या ५२ व्या वर्षी ६ सप्टेंबर २०२४ रोजी निधन झालं. रेड्डी यांनी टीआरएसचा युवा नेता म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती.

Story img Loader