ट्रकने धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघात सहा तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गुरुग्राम-फरिदाबाद रोडवर गुरुवारी रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. जतीन छाबड़ा, संदीप वाडिया, नोनू गुलाटी, पुनीत मंगला, विशाल सेठी आणि संदीप अशी मृतांची नावे आहेत. हे सहाजण पलवल येथील रहिवासी असून वाढदिवसांची पार्टी करून ते गुरुग्रामवरून पलवलच्या दिशेने येत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – गलवान व्हॅली आणि क्रिकेट…मनोधैर्य उच्च असल्याचं सांगत लष्कराने प्रसिद्ध केले फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी अल्टो गाडीने गुरुग्राम येथे गेले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर रात्री उशिरा आपापल्या घरी परतताना गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावर पाली गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ एका डंपरने त्यांच्या गाडीला जोरधार धडक दिली. या भीषण अपघातात गाडीचा संपूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या टीमने लगेच रुग्णवाहिका बोलावत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – IRCTC : आता तुम्ही बोलताच रेल्वे तिकीट होणार बुक, कसे ते जाणून घ्या?

दरम्यान, याप्ररकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. तसेच फरिदाबाद पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत असल्याची माहिती एसएचओ सतीश कुमार यांनी दिली.