जम्मूच्या सिदरा भागात राहत्या घरी एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही सामावेश आहे. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नाही – सुप्रीम कोर्ट
मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील सिदरा भागातील एका घरात दोन आणि दुसऱ्या घरात चार असे एकूण सहा जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये सकीना बेगम, त्यांच्या नसीमा अख्तर आणि रुबिना बानो या दोन मुली, मुलगा जफर सलीम, हबीबुल्लाचा मुलगा नूर-उल-हबीब आणि फारूकचा मुलगा सजाद अहमद असे दोन नातेवाईकांचा सामावेश आहे. मात्र, या सगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही.
पोलिसांकडून तपास सुरु
हे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.