सरकारी कार्यालयांवर हल्ला करण्याची योजना आखत असलेले तालिबानचे सहा दहशतवादी सुरक्षा रक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झाले.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेतून फुटलेल्या उस्ताद अस्लम गटाचे १० संशयित दहशतवादी काटची अबादी परिसरातील तलत पार्क येथे आल्याची खबर गुप्तचर यंत्रणांनी बुधवारी दिली.
शहरातील सरकारी कार्यालये आणि मान्यवर व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना हे दहशतवादी आखत होते, असे पोलिसांनी सांगितले. पंजाब पोलिसांच्या पथकाने सदर परिसराला वेढा घातला असता संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये सहा दहशतवादी ठार झाले.
या चकमकीनंतर चार दहशतवादी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे, स्फोटके, डिटोनेटर्स, दोन रायफली, तीन दुचाकी, चार पिस्तुले असा साठा हस्तगत केला. पसार झालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा