आंध्रप्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. ट्रकने रस्त्यावर उभ्या लॉरीला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डीसीपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलनाडू जिल्ह्यात गंभीर अपघात झाला असून सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि लॉरीमध्ये झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली होती. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

Story img Loader