श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी दोन स्वतंत्र चकमकींमध्ये एकूण सहा दहशतवादी ठार झाले आणि दोन जवान शहीद झाले. तर मोडेग्राम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले तसेच चिन्निगम येथूनही चार दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कुलगाम जिल्ह्यातील मोडेग्राम येथे शनिवारी दोन दहशतवादी ठार झाल्याची आणि एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली होती. या चकमकींबद्दल जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आर आर स्वैन यांनी सांगितले की, ‘इतक्या संख्येने दहशतवादी ठार होणे हे मोठे यश आहे. नि:संशयपणे, सुरक्षेविषयी वातावरण मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हा एक मोठा टप्पा आहे. संदेश देण्याच्या दृष्टीने हे यश अर्थपूर्ण आहे. दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी या मोहिमेचे यश सूचक आहे.’
First published on: 08-07-2024 at 06:44 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six terrorists killed in kashmir two soldiers martyred amy