शिमला : हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाबाहेर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल ऊर्मिला सिंग यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागांपैकी ३६ जागांवर विजय मिळाला होता.  वीरभद्र सिंग यांच्या मंत्रिमंडळात सध्या १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून या मंत्र्यांनाही मंगळवारी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्र्यांपैकी सुजनसिंग पठानिया, ठाकूरसिंग भारमौरी, मुकेश अग्निहोत्री, सुधीर शर्मा, प्रकाश चौधरी आणि धनीराम शांडिल या वीरभद्र सिंग यांच्या समर्थकांचा समावेश आहे, तर विद्या स्टोकस, कौलसिंग ठाकूर आणि जी. एस. बाली या त्यांच्या विरोधकांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.      

Story img Loader