कर्नाटकातल्या चित्रदुर्ग भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका घरातून पाच सांगाडे मिळाले आहेत. हे सगळे सांगाडे एकाच कुटुंबातल्या सदस्यांचे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय घडली घटना?
चित्रदुर्ग भागात असलेल्या जेल रोड परिसरात एक घर आहे. या घरात पोलिसांना पाच सांगाडे मिळाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. ही घटना समोर आली जेव्हा पोलिसांना एका कवटीबाबत माहिती मिळाली. या सगळ्यांना २०१९ मध्ये शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या मृतदेहांचे सांगाडे मिळाले आहेत.
पोलिसांना हे वाटतं आहे की एकाच कुटुंबातल्या पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली होती. हे सांगाडे त्यांचेच असावेत असं पोलिसांना वाटतं आहे त्या अनुषंगाने पोलीस आता तपास करत आहेत. ज्या घरात हे सांगाडे मिळाले आहेत ते घर PWD चे माजी अभियंता जगन्नाथ रेड्डी यांचं आहे. जगन्नाथ रेड्डी, त्यांची पत्नी प्रेमक्का, मुलगी त्रिवेणी आणि मुलं कृष्णा तसंच नरेंद्र यांच्यासह राहात होते. जगन्नाथ रेड्डी हे ८० वर्षांचे होते. मात्र त्यांच्या मुलांची लग्नं झालेली नव्हती. पोलिसांनी हा दावा केला आहे की या कुटुंबातल्या सदस्यांना मागच्या तीन वर्षांत कुणी पाहिलेलं नाही. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
ही घटना कशी समोर आली?
ही घटना समोर येण्याचं कारण म्हणजे एक कवटी आहे. ही कवटी कुत्रे बाहेर घेऊन आले होते. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास सुरु आहे. घराच्या आत अनेकदा तोडफोड झाल्याचे संकेत मिळाले आहेत. एका रुममध्ये चार मृतदेहांचे सांगाडे सापडले. यात दोन सांगाडे बिछान्यावर आणि दोन जमिनीवर पडलेले होते. एक सांगाडा दुसऱ्या खोलीत सापडला. देवेंगेरेवरुन फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी (एफएसएल) टीम आणि सीन ऑफ क्राइम ऑफिसर्सना (एसओसीओ) पुरावे गोळा करण्यासाठी बोलावलं आहे. घराच्या अवती-भोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृतांची ओळख स्पष्ट होईल. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.