Maharashtra Rain 2023: यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४ टक्के असणार आहे. यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एल निनोच्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, “ट्रिपल-डिप-ला निनामुळे गेल्या सलग चार वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा राहिलं. आता ला निना संपला आहे आणि एल निनोची शक्यता वाढत असून पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.”

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट
Temperature maharashtra, climate change,
थंडी आणखी दोन दिवस; पुन्हा तापमान वाढणार, जाणून घ्या हवामानातील बदल कशामुळे
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच

स्कायमेटनुसार, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल.

‘एल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे काय?

संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो.

मराठी विज्ञान परिषदेच्या अदिती जोगळेकर यांच्या मते, १६ व्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्यांनी ‘एल निनो’ असे नाव दिले. सामान्यत: पश्चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो. याविरुद्ध पूर्व-प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावर हवेचा उच्च दाब असतो. हवेच्या दाबातील फरकाने वारे आणि त्यासोबत बाष्प पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते त्यामुळे आग्नेय आशियासह भारतीय उपखंडात पाऊस पडतो. एका वर्षीच्या उन्हाळय़ामध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील १२-१८ महिने टिकू शकते. त्याची तीव्रता तापमानावर ठरते. ४ ते ५ अंश फॅरेनहाईट तापमानवाढ झाल्यास सौम्य, पण १४ ते १८ अंश फॅरेनहाईटने तापमानवाढ झाल्यास सर्वदूर परिणाम दिसतात.

हेही वाचा : अग्रलेख : सांग सांग भोलानाथ..

दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम घडतो. पूर्वप्रशांत महासागरातील पेरू, इक्वाडोरच्या किनाऱ्यालगत नेहमीपेक्षा प्रबळ उष्ण प्रवाह तयार झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या उलट पश्चिमेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागरावर उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागराकडून बाष्पभारित वारे पूर्वेकडे वाहतात. याचा परिणाम म्हणून दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर आग्नेय आशियामध्ये अवर्षणाची स्थिती निर्माण होते. एल निनो सक्रिय झाल्यास व्यापारी वारे कमजोर होतात. सागरी प्रवाह व समुद्रपातळीत बदल घडतात. एल निनो प्रबळ असलेल्या वर्षी अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे कमी होतात. परंतु भारतीय उपखंडातील बऱ्याच देशांमध्ये दुष्काळ पडतो. भारतात गेल्या ५० वर्षांत पडलेले १३ पैकी १० दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत.

हेही वाचा : बागलाण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, मालेगाव तालुक्यातही वादळी पाऊस, पिकांचे नुकसान

‘ला निनाचा’ प्रभाव याच्या उलट असतो. उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड झाल्यावर ला-निना प्रभावी होतो. ‘ला निना’ वर्षांत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. तसेच तीव्र व्यापारी वारे व सागरी प्रवाहांमुळे थंड व पोषक पाणी पृष्ठभागावर येऊन प्लवक व माशांची पैदास वाढते. एल निनो व ला निना या दोन प्रभावांचा संपूर्ण जगाचे जल-वायुमान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.

Story img Loader