उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर अवैध कत्तलखान्यांवर घालण्यात आलेल्या बंदीचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत अनेक बेकायदा कत्तलखान्यांना टाळे ठोकले आहे. या पार्श्वभूमीवर आता देशातील धार्मिक राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. कत्तलखाने बंद झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारांवर आलेली गदा आणि या व्यवसायात विशिष्ट धर्माचेच लोक काम करतात का, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साधारणपणे गोमांस निर्यात करणारा समूह विशिष्ट धर्माशी संबंधित असतो, असा समज आहे. मात्र, यासंबंधी नुकतीच एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात १० मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील ७४ कत्तलखान्यांपैकी १० सर्वात मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंदू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा