उत्तर जपानमध्ये सकाळी ९ वाजून ७ मिनिटांनी भूकंप होऊन सुनामी लाटा उसळल्या. २०११ मधील भूकंपानंतर प्रथमच तेथे सुनामी लाटा आल्या असल्या तरी त्यांचे स्वरूप फार मोठे नव्हते. पूर्वेकडील इवेट येथे कुजी भागात या लाटा उसळल्या असून, त्या अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी त्यांची ही वाढ मर्यादित असेल. इवेट परफेक्चरच्या इतर भागात १० सेंटिमीटरच्या लाटा उसळल्या.
विमानातून पाहिले असता सागरी पातळी फारशी वाढलेली नव्हती व बंदरांच्या भागात कुठलाही दृश्य बदल नव्हता असे एनएचके प्रसारण संस्थेने म्हटले आहे. त्यांनी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण केले. जेएमएने म्हटले आहे, की सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी पॅसिफिकमध्ये ६.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र मियाकोच्या पूर्वेला २१० कि.मी. अंतरावर व १० किलोमीटर खोलीवर होते. लाटांची उंची २० सेंटिमीटर म्हणजे आठ इंच होती. काही लाटा ३.३ फूट म्हणजे एक मीटरपेक्षा लहान होत्या असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small tsunami hits japan after 6 8 earthquake