जपानमध्ये मोठा भूकंप होऊन सुनामी लाटा उसळल्या. त्या फार मोठय़ा नव्हत्या पण त्यांनी ३० से.मी. उंची गाठली होती. सागरात झालेल्या भूकंपानंतर या सुनामी लाटा उसळल्या. या भूकंपामुळे कुठलीही हानी झाली नाही कारण किनारी भागातील लोकांना पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या.
७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर इशिनोमाकी या बंदराच्या दिशेने सुनामीच्या छोटय़ा लाटा आल्या. फुकुशिमा या अणुप्रकल्पातील लोकांना अगोदरच बाहेर हलवण्यात आले होते, असे क्योडो वृत्तसंस्थेच्या बातम्यात टोकियो वीज कंपनीच्या सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. अणुप्रकल्पात कुठलेही वाईट परिणाम दिसून आलेले नाहीत. पहाटे सव्वादोन वाजता इशिनोमाकी या मियागी परफेक्चरच्या आग्नेयेला असलेल्या इशिनोमाकी या ठिकाणी हा भूकंप झाल्याचे यूएस जिऑलॉजिकल सव्र्हे (यूएसजीएस) या संस्थेने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in