पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांना त्वरित मंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली. दरम्यान, इराणी यांच्या कन्येच्या वकील कीरत नागरा यांनी हे आरोप फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले, की ‘सिली सोल्स’ या मद्यालयाची मालकी माझ्या अशिलाकडे नाही. हे मद्यालय त्या चालवतही नाहीत. त्यांना कोणत्याही यंत्रणेकडून याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आलेली नाही. काँग्रेसने शनिवारी कागदपत्रे प्रसृत करत असा आरोप केला गेला, की अबकारी विभागातर्फे स्मृती इराणी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ज्या अधिकाऱ्याने ही नोटीस बजावली त्याची बदली होत असल्याचे समजते, असाही आरोप काँग्रेसने केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा