केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती फोडण्याचा संशय असलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या ज्या पाच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांची फेरनियुक्ती करावी, असे आवाहन इराणी यांनी विद्यापीठाला केले आहे.
सार्वजनिक जीवनात एखाद्याने टीका सहन करण्यास सामोरे जावयास हवे आणि आपण तेच करीत आहोत. दिल्ली विद्यापीठ ही स्वायत्त संस्था असल्याने, निलंबित करण्यात आलेल्या पाच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती करावी, असे आपण कुलगुरूंना आवाहन करीत आहोत, असे स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे. सदर पाच शिक्षकेतर कर्मचारी गोपनीय कक्षात शिरले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा