मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे देण्याच्या निर्णयावरून दिल्लीतील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून कॉंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आता भाजपच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी बुधवारी या वादामध्ये उडी घेत थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरच निशाणा साधला.
फोटो गॅलरी – स्मृती इराणी : अभिनेत्री ते मंत्री
उमा भारती यांनी बुधवारी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, अर्थतज्ज्ञ असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना निर्देश देणाऱया सोनिया गांधींची शैक्षणिक पात्रता काय? सोनिया गांधींनी आपल्या पक्षाच्या खासदारांना तोंड बंद ठेवण्यास सांगावे नाहीतर स्वतःची शैक्षणिक पात्रता जाहीर करावी.
भाजपचे नेते संतोष गंगवार यांनीही या मुद्द्यावरून सोनिया गांधींवर टीका केली आहे. ते म्हणाले, सोनिया गांधी किती शिकल्या आहेत, हे मला कॉंग्रेसजनांना विचारावेसे वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवरून कॉंग्रेस भाजपमध्ये ‘तू तू मै मै’
मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा स्मृती इराणी यांच्याकडे देण्याच्या निर्णयावरून दिल्लीतील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

First published on: 28-05-2014 at 01:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti iranis qualification sparks war of words