मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान करण्यात आलेल्या कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या वडिलांनी त्यांची सून स्मृती सिंग यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केला आहे. स्मृती सिंग कीर्ति चक्र आणि सानुग्रह अनुदान घेऊन देशातून पळून जाण्याच्या विचारात असल्याचं त्यांनी म्हटलंय. एबीपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

स्मृतीने प्रेमाच्या नावाखाली माझ्या मुलाची फसवणूक केली. तिचे त्याच्यावर प्रेम नव्हते”, असं अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंग यांनी केला आहे. तसंच, सानुग्रर अनुदान घेऊन स्मृती सिंग ऑस्ट्रेलियात पळून जाण्याच्या विचारात असल्याचंही ते म्हणाले.

Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Wife killed her husband, woman kills husband with wood
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यात वाद; पतीचा खून
Paithan taluka, june Kaswan village,
एकतर्फी प्रेमातून तिहेरी हत्याकांड; आरोपीला तिहेरी जन्मठेप

कॅप्टन अंशुमन सिंग यांना गेल्यावर्षी वीरमरण आले. लग्नाच्या अवघ्या पाचव्याच महिन्यात ते शहीद झाले. त्यामुळे त्यांच्यासह संपूर्ण देशातून हळहळू व्यक्त केली गेली. या वर्षी जून महिन्यात अंशुमन सिंग यांना मरणोत्तर कीर्ति चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान स्वीकारण्यासाठी अंशुमन सिंग यांच्या पत्नी स्मृती सिंग आणि त्यांच्या आई राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या.

हेही वाचा >> Smriti Singh : “मुलाचं सामान आणि कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी निघून गेली, फोटोव्यतिरिक्त…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या आई-वडीलांचे गंभीर आरोप!

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. परंतु, हे चक्र मिळाल्यानंतर स्मृती सिंग यांनी अंशुमन सिंग यांच्या पालकांशी संपर्क तोडला असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. स्मृती कीर्ति चक्र आणि सामान घेऊन निघून गेल्या आहेत, असा आरोप अंशुमन सिंग यांच्या पालकांनी केला होता. तसंच, सानुग्राह अनुदानही त्यांनी घेतलं असल्याचं ते म्हणाले. एवढंच नव्हे तर कीर्ति चक्राला साधा स्पर्शही करू दिला नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारामुळे नेक्स्ट ऑफ किनमधील नियमांत बदल केले पाहिजेत, अशी मागणी रवीप्रताप सिंग यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.

स्मृती सिंग आणि त्यांच्या सासूबाई कीर्ति चक्र सन्मान स्वीकारताना.

स्मृती सिंग यांनी पत्रव्यवहारात कायमचा पत्ता बदलला

 कॅप्टन अंशुमन सिंग यांचे वडील रवी प्रताप सिंग म्हणाले की, त्यांच्या सुनेने त्यांच्या मुलाशी संबंधित सर्व पत्रव्यवहारात कायमचा पत्ता बदलला आहे. आता ती गुरुदासपूर येथे राहते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची रक्कम आणि इतर सुविधांबाबतही नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात जेणेकरुन शहीदाच्या पत्नीसह पालकांना त्यांचे हक्क मिळतील. सरकारने पत्नीसह पालकांना कीर्ती चक्रासारख्या लष्करी सन्मानाची प्रतिकृती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलाच्या आठवणी जपता येतील.”

Story img Loader