जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून मोसमातील पहिली हिमवृष्टी झाल्याने तेथे कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या थंडीने एका साधूचा व एका भिकाऱ्याचा बळी घेतला असून, हिमवर्षांवामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला आहे.
काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून जोरदार हिमवृष्टी सुरू झाली. शुक्रवारी सकाळीही बर्फ कोसळत राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर हा २९४ किमीचा महामार्ग पूर्णपणे बंद पडला. काश्मीर खोऱ्यातील तापमानाचा पारा खाली घसरला असून किमान तापमान १३ पूर्णाक दोन दशांश सेल्सिअसइतके नोंदवले गेले. थंडीच्या या लाटेत एका साधूचा आणि एका भिकाऱ्याचा बळी गेला, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. उत्तराखंडातही मसुरी, कुमाऊ, गढवाल आदी ठिकाणी जोरदार हिमवृष्टी झाली. उत्तराखंडात जोशीमठ येथे १२, तर डेहराडून येथे १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. काश्मीर आणि उत्तराखंडातील या हिमवृष्टीमुळे पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ येथे जोरदार पाऊस झाला, या ठिकाणी पारा १० ते १२ अंशांपर्यंत खाली घसरला.
काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेत दोघांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीरमधील बहुतांश ठिकाणी गुरुवारी संध्याकाळपासून मोसमातील पहिली हिमवृष्टी झाल्याने तेथे कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. या थंडीने एका साधूचा व एका भिकाऱ्याचा बळी घेतला असून, हिमवर्षांवामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-12-2012 at 12:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snow in the hills two dead due to cold