अमेरिकेची राष्ट्रीय तपास संस्था अनेक देशांची माहिती चोरत असल्याचे गुपित फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने ब्राझीलच्या लोकशाहीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. ब्राझीलने आपल्याला आश्रय द्यावा, अशी त्याची अपेक्षा असल्याचे यातून सूचित होत आहे.
सध्या रशियाने त्याला तात्पुरता आश्रय दिला आहे. अमेरिकी गुप्तचर तंत्रज्ञ असलेल्या स्नोडेन याने यापूर्वी ब्राझील व अन्य देशांकडे आश्रय मागण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्याला यश आले नव्हते.अखेर त्याने नाइलाजास्तव रशियात आश्रय घेतला होता.
दरम्यान, स्नोडेन याने आश्रयासाठी कधीही अधिकृत विनंती केलेली नाही, असे ब्राझीलच्या अध्यक्षा दिलमा रोसेफ यांनी सांगितल्याचे तेथील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
ब्राझीलमधील लोकशाहीची स्नोडेनकडून प्रशंसा
अमेरिकेची राष्ट्रीय तपास संस्था अनेक देशांची माहिती चोरत असल्याचे गुपित फोडणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने ब्राझीलच्या लोकशाहीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
First published on: 24-12-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snowden in charm offensive in brazils press